contries from around world celebrates happy new year in diffrent time | #Welcome2018 : पाहा कोणत्या देशात किती वाजता होते नववर्षाची सुरुवात
#Welcome2018 : पाहा कोणत्या देशात किती वाजता होते नववर्षाची सुरुवात

ठळक मुद्देझगमगत्या रोषणाईत, फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचं स्वागत केलं जातंप्रत्येक देशातली सुर्योदयाची वेळ वेगळी असते.पण कोणत्या देशात सर्वप्रथम नववर्ष सुरू होतं हे तुम्हाला माहितेय का?

मुंबई : जगातल्या प्रत्येक देशात सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी आहे. आणि त्यानुसार तिथे तिथे सरत्या वर्षाला अलविदा देऊन नववर्षाचं स्वागत केलं जातं. पृथ्वीच्या प्रदक्षिणासोबत  प्रत्येक देशाची वेळ ठरवली जाते. त्यामुळे थर्टीफस्टच्या रात्री सगळ्यात आधी कोणता देश नवीन वर्षाचं स्वागत करेल हे पाहूया.

आणखी वाचा - यंदा न्यू इअर पार्टीसाठी पुण्यातील ही हॉटेल्स नक्की ट्राय करा

झगमगत्या रोषणाईत, फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचं स्वागत केलं जातं. पण कोणत्या देशात सर्वप्रथम नववर्ष सुरू होतं हे तुम्हाला माहितेय का? प्रत्येक देशातली सुर्योदयाची वेळ वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळी नववर्ष सुरू होतं. आपण भारतीयांच्या घड्याळानुसार म्हणजेच आपल्या घडाळ्यात जेव्हा सायंकाळचे ४.३० वाजलेले असतील तेव्हा तोंगा या देशात रात्रीचे १२ वाजलेले असतील. म्हणजेच जगातील सगळ्यात पहिलं नववर्ष तोंगा या शहरात साजरं होईल. ओशनिया खंडातील हा एक छोटासा देश आहे. तसंच, सामोआ, ख्रिसमस आइसलँड या देशात सर्वप्रथम नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर आपल्या घडाळ्यात सायंकाळचे ४.४५ वाजलेले असतील तेव्हा न्यूझीलंडमध्ये नववर्षांचं स्वागत करण्यात येईल. हळूहळू त्या आजूबाजूच्या देशात रात्र संपून नववर्षाच्या स्वागताला उधाण येईल. आपल्या देशाच्या आजूबाजूला नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार असे देश आहेत. हे देश आपल्या प्रमाणवेळेनुसार थोडेसे मागेपुढे आहेत. म्हणजेच, आपल्या घडाळ्यात जेव्हा रात्रीचे ११.३० वाजलेले असतील तेव्हा बांग्लादेशात नववर्षाची धूम सुरू होईल. मग पावणेबाराच्या दरम्यान नेपाळमध्ये नववर्ष सुरू होईल मग आपल्या भारतात नववर्षाचं जंगी स्वागत करण्यात येईल. भारतापेक्षा पाकिस्तान अर्धातास मागे असल्याने भारतात जेव्हा १२.३० वाजलेले असतील तेव्हा पाकिस्तानात नववर्ष सुरू होईल. यानंतर हळूहळू अफगाणिस्थान, ग्रीस, जर्मनी, अर्जेटिना या देशात भारतात जेव्हा मध्यरात्र सुरू असेल तेव्हा नववर्ष सुरू होईल. 

आणखी वाचा - 2018 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी ‘या’ सवयी मोडाच

आणखी वाचा - #Flashback2017 : सरत्या वर्षात 2017मध्ये सोशल मीडियावर या गोष्टी ठरल्या वादग्रस्त

१ जानेवारी २०१८ रोजी सकाळचे जेव्हा ९.३० वाजतील तेव्हा कॅनडात नववर्षाची धूम सुरू झालेली असेल. त्यानंतर युएसच्या काही देशात नववर्ष सुरू होईल. सगळ्यात उशीरा युएसएच्या बेकर आइसलँड, होलंड आइसलँड या शहरात नववर्ष सुरू होणार आहे. प्रत्येक देशाची प्रमाणवेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या देशात ठीक १२ वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर उतरत असले तरीही इतर देशात त्यावेळी दुपार किंवा सायंकाळ झालेली असते. हे फार गंमतीदार वाटत असलं तरी खरं आहे. 

बेस्ट ऑफ २०१७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Web Title: contries from around world celebrates happy new year in diffrent time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.