जर्मनीत अपघाताने बनला चॉकलेटचा रस्ता; कारण वाचून हैराण व्हाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 04:30 PM2018-12-16T16:30:01+5:302018-12-16T16:31:08+5:30

ख्रिसमसच्या पुर्वतयारीच्या काळातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चॉकलेट रस्त्यावर पसरल्याने ते पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

A chocolate road accidentally happened in Germany; read the reason? | जर्मनीत अपघाताने बनला चॉकलेटचा रस्ता; कारण वाचून हैराण व्हाल?

जर्मनीत अपघाताने बनला चॉकलेटचा रस्ता; कारण वाचून हैराण व्हाल?

Next

बर्लिन : पश्चिम जर्मनीतील वर्ल शहरामध्ये एक चॉकलेट बनविणारी कंपनीचा टँकला गळती लागल्याने चक्क चॉकलेटचा रस्ताच तयार झाला होता. रस्त्यावर टँकमधली तब्बल 1 टन चॉकलेटची पेस्ट पसरली होती. यानंतर रस्तयाच बंद करण्यात आला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आल्याचे अग्निशामन दलांनी सांगितले.


ख्रिसमसच्या पुर्वतयारीच्या काळातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चॉकलेट रस्त्यावर पसरल्याने ते पाहण्यासाठी गर्दी झाली होती. असा प्रकार याआधी कधीच झाला नव्हता. वर्ल शहरातील मध्यभागी असलेल्या द्रीमीस्टर या चॉकलेट कंपनीच्या टँकमध्ये पिघळलेली चॉकलेट ओव्हरफ्लो झाली. यामुळे हे चॉकलेटचे वितळलेले द्रव स्वरुपातील मिश्रण एखाद्या नदीसारखे रस्त्यावर पसरू लागले. लोकांना वाटले की रस्त्यावर एखादे अनोखे कारपेट अंथरण्यात येत आहे.


यामुळे लोकांची गर्दी न होण्यासाठी रस्ता तातडीने बंद करण्यात आला. तसेच लोकांना थांबण्याचेही आवाहन करण्यात आले. रस्त्यावर वाहत असलेली चॉकलेट काही वेळातच घट्ट झाली. दोन तासांनी ही चॉकलेट काढण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली. चॉकलेटवर गरम पाणी टाकण्यात आले यानंतर फावड्याने चॉकलेटचे थर काढण्यात आले.

 
या घटनेमुळे कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ख्रिसमसला चॉकलेटची मोठी मागणी असल्याने काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. चॉकलेट रस्त्यावर परसण्य़ाची ही पहिलीच घटना नाही. तर पोलंडमधील हायवेवर अपघातात टँकर पलटी झाला होता. यामधून द्रव स्वरुपातील 12 टन चॉकलेट रस्त्यावर पसरले होते.

Web Title: A chocolate road accidentally happened in Germany; read the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Germanyजर्मनी