ट्रम्प यांच्या धमकीनं चीनचा शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 02:59 PM2019-05-06T14:59:57+5:302019-05-06T15:00:50+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर मोठं आयात शुल्क आकारण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये भूकंप आला आहे.

The Chinese stock market collapsed by trump, the Sensex fell by 300 points | ट्रम्प यांच्या धमकीनं चीनचा शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला

ट्रम्प यांच्या धमकीनं चीनचा शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला

Next

बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर पुन्हा मोठं आयात शुल्क आकारण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये भूकंप आला आहे. अमेरिकेनंतर आशियाई शेअर बाजार 5 टक्क्यांहून अधिकनी कोसळला आहे. चीनचा मुख्य बेंचमार्क इंडेक्स शांघाई कंपोझिट 5.58 टक्के आणि हाँगकाँगची प्रमुख बेंचमार्क इंडेक्स हँगसँग 3.31 टक्क्यांनी पडला आहे. यादरम्यान भारतीय शेअर बाजारही गडगडला आहे.

बीएसईचा 30 शेअर असलेल्या प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये 310 अंकांची घट नोंदवली गेली असून, तो 38643च्या स्तरावर आहे. तर दुसरीकडे एनएसईचा 50 शेअरवाला प्रमुख इंडेक्स निफ्टी 95 अंकांची घट झाली असून, 11620च्या जवळपास आहे. चीनचा शेअर बाजारा सोमवारी 5.6 टक्क्यांनी कोसळून बंद झाला. चीनच्या सेन्सेक्समधली ही फेब्रुवारी 2016नंतरची सर्वात मोठी घट आहे. अमेरिकेकडून चीनवरच्या सामानावर आयात शुल्क वाढवण्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे शेअर बाजार कोसळल्याचं प्रमुख कारण तज्ज्ञा सांगतायत. त्यामुळे जगभरात शेअर बाजारात घट नोंदवली गेली असून, भारतातल्या शेअर बाजारावरही याचा परिणाम जाणवला आहे.


सध्या तरी गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूक केली पाहिजे, असंही त्यांनी सल्ला दिला आहे. म्युच्युअल फंडातील रक्कमही काढू नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर चीननंही सावध पावलं टाकण्यात सुरुवात केली आहे. चीन पुढच्या आठवड्यात होणारी बैठक रद्द करण्याच्या विचारात आहे. चीनच्या वस्तूवर असलेलं 10 टक्के आयात शुल्क आता वाढवून 25 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनं एक प्रकारे चीनवर दबाव निर्माण केला आहे. 
.

Web Title: The Chinese stock market collapsed by trump, the Sensex fell by 300 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.