पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 5:51am

दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानचे जे उल्लेखनीय योगदान आहे, ते जागतिक समुदायाने ओळखायला हवे, असे मत व्यक्त करत पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे.

बीजिंग / इस्लामाबाद : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानचे जे उल्लेखनीय योगदान आहे, ते जागतिक समुदायाने ओळखायला हवे, असे मत व्यक्त करत पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे. गत १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारल्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. चीनने म्हटले आहे की, पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत खूप प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घ्यावी. चीन आणि पाकिस्तान चांगले सहकारी आहेत. ते संबंध आम्ही अधिक मजबूत करू इच्छितो. (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या मदत थांबविण्याच्या धमकीनंतरही पाकिस्तान काळजी करताना दिसत नाही. कारण २०१० नंतर अमेरिकेकडून होणारी ही मदत खूपच कमी होत गेली आहे.  

संबंधित

पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला, भारताकडून समन्स 
चक दे! चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा
कबड्डी : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
चीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली
काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिकांचा दावा
अमेरिकेत १०० भारतीय घुसखोरांची तुरुंगात रवानगी
सौदी अरेबिया करणार चमत्कार, कतार देशाचे बेटामध्ये रुपांतर करणार
सायनाइडचा वापर करुन नवऱ्याला मारणाऱ्या पत्नीस शिक्षा, प्रियकरालाही कारावास
चीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली

आणखी वाचा