चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 05:15 PM2017-08-21T17:15:55+5:302017-08-21T17:21:41+5:30

आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही.

China can not win war with India! Only on both sides will the bloodshed | चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपात

चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपात

Next
ठळक मुद्दे चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. भारतीय लष्करासमोर त्यावेळी चिनी सैन्य पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते.

नवी दिल्ली, दि. 21 - आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला  रक्तपात होईल. 

या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल. अमेरिकेसमोर चीन दुबळा ठरेल. 62 च्या युद्धानंतर पाचवर्षांनी 1967 सालच्या सप्टेंबर महिन्यात चिनी लष्कराने नाथु ला आणि चाओ ला येथील भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. भारतीय लष्करासमोर त्यावेळी चिनी सैन्य पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते. चीनचा हा हल्ला पूर्णपणे फसला होता. त्यामुळे चीन युद्धाचा धोका पत्करण्याची शक्यता कमीच आहे. 

भारत आणि चीनची सीमा 3488 किलोमीटरमध्ये पसरली असून, युद्धामध्ये कोणा एकाला पूर्ण वर्चस्व मिळवता येणार नाही. डोकलामची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर, भारताला वर्चस्व मिळवण्याची संधी आहे. सीमेवरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत चीनपेक्षा मागे असला तरी, युद्ध झालेच तर दोन्ही देशांच्या लष्कराचे नुकसान होईल. 

भारतावर जरब बसवण्यासाठी चिनी लष्कराने तिबेटच्या अज्ञात भागात केला जोरदार युद्ध सराव
सातत्याने युद्धखोरीची भाषा करणा-या ग्लोबल टाइम्स या वर्तमानपत्राने आता चिनी लष्कराने अज्ञातस्थळी जोरदार युद्ध सराव केल्याचे वृत्त  दिले आहे. डोकलाम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा युद्ध सराव होत असल्याकडेही ग्लोबल टाइम्सने लक्ष वेधले आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच चिनी लष्कराच्या पश्चिमी कमांडच्या 10 तुकडयांनी या युद्ध सरावात भाग घेतला होता. भारतीय सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील चिनी लष्कराच्या तुकडयांचा पश्चिमी कमांडमध्ये समावेश होतो. युद्धसरावाचा व्हिडीओ प्रसारीत करणे हा भारतावर जरब, धाक बसवण्याच्या रणनितीचा एक भाग आहे. 
 

Web Title: China can not win war with India! Only on both sides will the bloodshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन