या देशात पॉर्न पाहणाऱ्यांवर येणार नियमांची गदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:28 PM2017-11-09T18:28:52+5:302017-11-09T18:36:43+5:30

पॉर्न साईटवर बंदी आणणं सहज शक्य नसलं तरीही त्यावर काही निर्बंध आणण्याचा प्रय़त्न नक्की केला जातो.

Calls on the lawmakers will come in this country | या देशात पॉर्न पाहणाऱ्यांवर येणार नियमांची गदा

या देशात पॉर्न पाहणाऱ्यांवर येणार नियमांची गदा

Next
ठळक मुद्देवैयक्तिक माहिती शेअर करणं घातक असल्याची प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. लहान मुलांनी पॉर्न पाहू नये म्हणून सरकारने असा नियम केला आहे. अशी माहीती न घेणाऱ्या साईट्स बंद करण्यात येतील.

युनायटेड किंगडम : येथे पॉर्न बघणाऱ्यांवर लवकरच नवा नियम येणार आहे. त्यांना त्यांची सर्व माहिती देऊनच पोर्नोग्राफी पाहता येणार आहे. येत्या वर्षात १८ वर्षांखालील कोणाही व्यक्तीने पॉर्न पाहू नये, यासाठी असा नियम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

डिजिटल इकॉनॉमी अॅक्टनुसार पॉर्न साईट्सचा वापर करताना आधी आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे. पॉर्न साईटकडून व्ह्यूव्हर्सची माहिती न घेणाऱ्या साईट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांकडून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पॉर्न साईटच्या मालकांनाही हा नियम कडेकोट पाळणे गरजेचे आहे.

पॉर्न साईटचा वापर करताना पाहणाऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती देता यावी याकरता एक सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. माईंडगीक या आयटी कंपनीकडून ही सिस्टीम तयार करण्यात येणार असून त्याद्वारे पॉर्न पाहण्यासाठी इकडे आधी साईन इन करणं गरजेचं असणार आहे. साईन केल्यावर तुम्हाला तुमची प्रोफाईल इकडे बनवता येईल, जेणेकरून त्यात तुमची सर्व माहिती असेल. 

पोर्न साईटवर आपली स्वत:ची माहिती शेअर करणं घातक असल्याची प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. हॅकर्सच्या हाती जर अशी माहिती मिळाली तर ती संबंधित व्यक्ती धोक्यात येऊ शकते. जून २०१५ साली एका बाह्यविवाह संबंधासाठी असलेल्या एका संकेतस्थळावरून काही हॅकर्सने माहिती चोरली असल्याचीही घटना समोर आली आहे. त्यामुळे पॉर्न साईटचा वापर करण्याआधी वापरकर्त्यांना त्यांची माहिती देणं कदाचित घातक ठरू शकतं. मात्र लहान मुलांनी पॉर्न साईट पाहू नये किंवा १८ वर्षावरील व्यक्तींनीच पॉर्न साईटवर जाण्यासाठीच युनायटेड किंग्डमच्या सरकारने असा नियम केला आहे. 

सौजन्य - www.thesun.co.uk

Web Title: Calls on the lawmakers will come in this country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.