ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20  - इंटरनेटवरील लोकप्रिय ब्राऊझर असलेल्या गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स आणि ऑपेरा यांचा वापर तुम्हीही करत असाल तर सावधान. इंटरनेटवर सर्च करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या ब्रऊझरमध्ये एक मोठी त्रुटी आढळली असून त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. या त्रुटीमुळे हॅकर्स वापरकर्त्यांना सहजपणे गंडा घालू शकतात. तसेच त्याची कुणाला खबरही लागू शकत नाही. 
 
चीनमधील सुरक्षा संशोधक जुदोंग शेंग यांना या ब्राऊझरमध्ये उणीव आढळून आली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने दिले आहे. त्याच्या मदतीने हॅकर्स कुठल्याही प्रसिद्ध सेवेच्या साईट्सचा खोटा पत्ता दाखवी शकताता. त्याच्या माध्यमातून युझर्सच्या बँकिंग व्यवहारांची माहिती आणि लॉगइन डिटेल्स हॅकर्स सहज चोरू शकतात. त्यासाठी हॅकर्सकडून पनीकोडचा वापर केला जात आहे. 
इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये वेबसाईट्स सुरू करण्यासाठी पनीकोडचा वापर सुरू झाला आहे. पण हॅकर्सकडून त्याचा वापर प्रसिद्ध वेबसाईट्सच्या बनावट वेबसाईट बनवण्यासाठी करण्यात येत आहे.  क्रोम आणि फायफॉक्समध्ये दोन्ही डोमेन एकसारखे दिसत असल्याने वापरकर्त्यांना त्यातील फरक ओळखता येत नाही. 
 
अशा प्रकारे हॅकर्स प्रसिद्ध संकेतस्थळांची कॉपी करून लोकांना फसवू शकतात. हा धोका क्रोम, फायरफॉक्स आणि ऑपेरा या ब्राऊझरवरच आहे. मायक्रोसॉफ्ट एज, इंटरनेट एक्सप्लोरर आणि सफारी यांच्यावर याचा प्रभाव पडत नाही. कारण ते अॅड्रेसबारवर योग्य पनिकोड दाखवतात. 
 
 मोझिला वापरत असाल तर घ्या ही खबरदारी
- अॅड्रेस बारवर  about: config टाइप करा आणि एंटर प्रेस करा
- सर्च बारवर पनीकोड टाइप करा 
- आता ब्राऊझर सेटिंगमध्ये network.IDN_show_punycode दिसेल. त्यावर डबल क्लीक करा वा राइट क्लीक करा आणि व्हॅल्यूवर Fals ऐवजी True टाइप करतात.   
 
सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करणाऱ्यांना मात्र क्रोम 58च्या अपडेट होण्याची वाट पाहावी लागणार आहे. एप्रिलच्या अखेरीस कंपनी त्याचे अपडेशन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी तुम्ही Punycode Alert  नावाचे एक्सटेंशन अॅड करू शकता. त्यामुळे URL मध्ये पनिकोड असल्यावर तुम्हाला अलर्ट मिळत जाईल.