ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 21 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी मालियाचा पाठलाग करणा-या एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे.  जाएर निलटन कार्डोसो, असे सीक्रेट सर्व्हिसनं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कार्डोसोवर बराक ओबामा यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. शिवाय, त्यानं व्हाइट हाऊसमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला होता.
मालियाच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ओळखलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. 
 
मालिया ज्या कंपनीमध्ये इंर्टनशिप करते आहे, त्या कंपनीच्या इमारतीत कार्डोसो पोहोचला. यावेळी त्यानं मालियाकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 
 
दरम्यान, सीक्रेट सर्व्हिसनं दिलेल्या माहितीनुसार कार्डोसो मानसिक आजारानं पीडित आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.