आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं हार्वे विंस्टिनवर केला लैंगिक शोषणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:29 AM2018-02-05T07:29:18+5:302018-02-05T07:35:47+5:30

हॉलिवूड अभिनेत्री आणि किल बिल स्टार उमा थरमन हिने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी 16 वर्षांची असताना माझ्याहून 20 वर्षांनी मोठा असलेल्या हार्वे विंस्टिन यानं माझं लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट हॉलिवूड अभिनेत्री उमा थरमन हिनं केला आहे.

Another famous actress has been charged with harassing sexual harassment on Harvey Winning | आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं हार्वे विंस्टिनवर केला लैंगिक शोषणाचा आरोप

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं हार्वे विंस्टिनवर केला लैंगिक शोषणाचा आरोप

Next

वॉशिंग्टन-  हॉलिवूड अभिनेत्री आणि किल बिल स्टार उमा थरमन हिने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी 16 वर्षांची असताना माझ्याहून 20 वर्षांनी मोठा असलेल्या हार्वे विंस्टिन यानं माझं लैंगिक शोषण केलं होतं, असा गौप्यस्फोट हॉलिवूड अभिनेत्री उमा थरमन हिनं केलाय. एका वृत्तपत्राच्या लेखातून तिनं हा आरोप केला आहे. 

हार्वे विंस्टिन यानं 1990च्या दशकात मला लंडनमधल्या एका हॉटेलमध्ये नेलं आणि हॉटेलच्या बंद खोलीत माझं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हॉटेलमध्ये त्यानं मला जमिनीवर झोपवलं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे माझा उपभोग घेण्याचा प्रयत्न करू लागला, ही माझ्यासाठी सर्वात दुःखद घटना होती. लेखात पुढे तिनं लिहिलंय, तो माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत त्यानं माझी एक गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन माफीसुद्धा मागितली. त्या फुलांचा रंग पिवळा होता. 

अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे विंस्टिन याच्यावर यापूर्वीही अंजेलिना जोली, रोज मॅकगोवन आणि सलमा हॅकसारख्या अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी रोज मॅकगोवन हिनं या प्रकरणात एक स्पष्टीकरणही दिलं होतं. 

Web Title: Another famous actress has been charged with harassing sexual harassment on Harvey Winning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.