American President and I had no sex relations, porn star Stormi disclosure | अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि माझ्यामध्ये कधीही सेक्स संबंध नव्हते, पॉर्न स्टार स्टॉर्मीचा खुलासा
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि माझ्यामध्ये कधीही सेक्स संबंध नव्हते, पॉर्न स्टार स्टॉर्मीचा खुलासा

ठळक मुद्देमला तोंड बंद ठेवण्यासाठी भरपूर पैसे दिले म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संबंध असल्याचे फेटाळून लावले असे परदेशी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काही दिवस आधी स्टॉर्मीला तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्या एका जवळच्या सहका-याने 1लाख 30 हजार डॉलर दिले.

वॉशिंग्टन - जिमी किमेल लाईव्ह या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या काही तास आधी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने तिच्या स्वाक्षरीसह एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकातून तिने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शरीरसंबंध असल्याचे जे आरोप होत आहेत त्यावर  खुलासा केला आहे. याआधी 2006, 2011, 2016, 2017 साली सुध्दा माझ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी सुद्धा मी हे आरोप फेटाळून लावले होते आणि आता सुद्धा नाकारत आहे. 

मला तोंड बंद ठेवण्यासाठी भरपूर पैसे दिले म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध नाकारले असे परदेशी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. मूळातच असे काही घडलेले नाही त्यामुळे या आरोपात अजिबात तथ्य नाही असे स्टॉर्मीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काही दिवस आधी स्टॉर्मीला तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्या एका जवळच्या सहका-याने 1लाख 30 हजार डॉलर दिले असे वृत्त जानेवारीच्या सुरुवातीला वॉल स्ट्रीट जनरलने दिले त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले. व्हाईट हाऊसनेआधीच हे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांची पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प बाळंत झाल्यानंतर ट्रम्प आणि स्टॉर्मीच्या नात्याची सुरुवात झाली होती असे म्हटले जाते. 

2011 साली एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत स्टॉर्मीने ट्रम्प यांच्यासोबतच्या नात्यावर खुलासा केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.  2006 साली ट्रम्प आणि माझ्यामध्ये सेक्स रिलेशनशिप होती तसेच आमच्यामध्ये वर्षभर प्रेमसंबंध होते असे तिने म्हटले होते. 


Web Title: American President and I had no sex relations, porn star Stormi disclosure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.