'अ‍ॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस पत्नीपासून होणार विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 09:37 AM2019-01-10T09:37:30+5:302019-01-10T09:41:00+5:30

अ‍ॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस पत्नीपासून विभक्त होणार आहेत. जेफ बेजोस यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Amazon boss Jeff Bezos and wife MacKenzie divorce | 'अ‍ॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस पत्नीपासून होणार विभक्त

'अ‍ॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस पत्नीपासून होणार विभक्त

Next

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस पत्नीपासून विभक्त होणार आहेत. जेफ बेजोस यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेजोस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आमचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांना याबाबतची कल्पना आहे. आम्ही दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक प्रोजेक्ट्स आणि संयुक्त उपक्रमांमध्ये भागीदार राहण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 


जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांना चार मुले आहेत. मॅकेन्झी बेजोस या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. न्यूयॉर्कमध्ये नोकरीच्या मुलाखतीवेळी जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांची पहिल्यांदा भेट झाली होती. याशिवाय, मॅकेन्झी बेजोस या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी द टेस्टिंग ऑफ लूथर अलब्राइट आणि ट्रॅप्‍ससहित अनेक पुस्तके लिहिली आहेत.  

जेफ बेजोस यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना 1994 मध्ये केली होती. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जेफ बेजोस यांच्याकडे137 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेजोस यांचे नाव आहे.


 

Web Title: Amazon boss Jeff Bezos and wife MacKenzie divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.