ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 5 - जपानमध्ये लोकप्रिय असलेला एक मासा सहा लाख डॉलर इतक्या किमतीला विकला गेला आहे. येथील वार्षिक लिलावातील आतापर्यंतची सर्वात मोठी बोली या माशाला लावण्यात आली. 
जपानमधील टोकियोच्या प्रसिद्ध सुकिजी मच्छी मार्केटमध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच माशांचा लिलाव करण्यात आला. यावेळी जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या ब्लुफिन टुना नामक माशाला चक्क 600000 डॉलर इतक्या किमतीला विकण्यात आले. येथील सुशी रेस्तरॉंचे मालक कियोशी किमुरा यांनी ब्लूफिन टुनाची खरेदी केली. या माशाचे वजन 212 किलोग्रॅम (467 पौंड) इतके आहे. 
मला सुरुवातीला ही बोली थोडी महाग वाटली. मात्र, मी खूप आनंदी आहे. कारण ही बोली मी जिंकलो आणि ब्लूफिन टुना माशाचा आकारसुद्धा चांगला आहे, असे कियोशी किमुरा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नववर्षात माशांचा लिलाव करणे ही जपानमध्ये एक परंपरा बनली आहे.