इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 07:05 PM2017-11-24T19:05:21+5:302017-11-25T06:40:21+5:30

इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई प्रांतातील एका मशिदीवर शुक्रवारी दहशतवाद्यांना हल्ला केला. दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला.

85 killed and 80 injured in mosque attack in Egypt | इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी

इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी

Next

कैरो : इजिप्तच्या सिनाई प्रांतात शुक्रवारच्या नमाजाला लोक मशिदीत जमले असताना दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत आणि केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २३५ लोक ठार झाले आणि १२0 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी तो इसिसने घडवून आणला असावा, असा संशय आहे. लोक नमाज पढत असतानाच हा हल्ला करण्यात आला. आतापर्यंत इसिसने केलेल्या हल्ल्यात शेकडो पोलीस व जवान मृत्युमुखी पडले आहेत. इजिप्त सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.




घटनास्थळावर एकच गोंधळाची स्थिती आहे. रुग्णवाहिकांमधून जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे असे एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अब्देल फात्ताह यांनी सुरक्षेसंदर्भात तातडीची बैठक घेतली. 

सिनाईच्या काही भागात इसिसचे प्राबल्य वाढले आहे. उत्तर सिनाई प्रांतात इजिप्तच्या फौजांची इसिसच्या दहशतवाद्यांविरुद्ध लढाई सुरू आहे.  मागच्या तीन वर्षांपासून इथे जोरदार लढाई सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत इजिप्तच्या शेकडो पोलीस आणि सैनिकांचे बळी घेतले आहेत. 



 

 

Web Title: 85 killed and 80 injured in mosque attack in Egypt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट