माऊंट एव्हरेस्टवरून उचलला तब्बल 3000 किलो कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 09:52 AM2019-04-30T09:52:57+5:302019-04-30T09:55:42+5:30

नेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे.

3000 kg garbage was removed from mount everest under cleanliness drive | माऊंट एव्हरेस्टवरून उचलला तब्बल 3000 किलो कचरा

माऊंट एव्हरेस्टवरून उचलला तब्बल 3000 किलो कचरा

Next
ठळक मुद्देनेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे.5 दिवसांच्या या मोहिमेंतर्गत एव्हरेस्टवरून सुमारे 10 हजार किलो कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे. सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने 14 एप्रिलला ही मोहीम सुरू केली होती.

काठमांडू - नेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर मानले जाते. 45 दिवसांच्या या मोहिमेंतर्गत एव्हरेस्टवरून सुमारे 10 हजार किलो कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे. 

सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने 14 एप्रिलला ही मोहीम सुरू केली होती. 45 दिवस राबवली जाणारी एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम ही नेपाळी नववर्ष सुरू झालं त्यादिवसापासून सुरू झाली. या मोहिमेंतर्गत 10 हजार किलो कचरा एव्हरेस्टवरून गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन हजार किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन हजार किलो कचरा ओखालधुंगा येथे, तर 1000 किलो कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला असून त्यामध्ये प्लास्टीक, बिअर बॉटल्स, कॉस्मेटीक कव्हरचा समावेश आहे. कचरा पाठवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला आहे. 

बेस कॅम्पवरून पाच हजार किलो तसेच दक्षिण भागातून दोन हजार किलो तर कॅम्प 2 व 3 भागातून तीन हजार किलो कचरा गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माऊंट एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश या एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत आहे. या मोहिमेत सर्व लोक सहभागी आहेत. बेसकॅम्पच्या ठिकाणी चार मृतदेह सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत 23 दशलक्ष नेपाळी रुपये खर्च होणार आहेत. या मोसमात 500 परदेशी गिर्यारोहक व 1000 सहायक मोहिमात सहभागी होणार आहेत. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा परत आणला तर ते जास्त फायदेशीर ठरेल असे सांगण्यात आले आहे. एडंमड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी 29 मे 1953 रोजी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होते. त्यामुळे ही एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम त्यादिवशी संपणार आहे. माऊंट एव्हरेस्टची स्वच्छता करण्यासाठी सरकारने याआधीही प्रयत्न केले आहेत. 

 

Web Title: 3000 kg garbage was removed from mount everest under cleanliness drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.