जपानमध्ये भूकंपाचा धक्का, तीन जण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:12 AM2018-06-18T10:12:19+5:302018-06-18T10:26:09+5:30

जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला.  या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. 

3 dead as strong quake hits Japan | जपानमध्ये भूकंपाचा धक्का, तीन जण ठार 

जपानमध्ये भूकंपाचा धक्का, तीन जण ठार 

googlenewsNext

टोकियो : जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला.  या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. 

जपानच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, स्थानिक वेळेनुसार भूकंपाचे झटके सकाळी आठ वाजताच्या सुमारास जाणवले. तसेच, या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. तर, येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू ओसाका येथील उत्तरेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचबरोबर, या भागातील एका नऊ वर्षाच्या मुलीच्या अंगावर भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 



 

घटनास्थळी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. तसेच, या भूकंपात मोठ्याप्रमाणात वित्तहाणी झाली  झाली असून मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वाढविण्यात येत आहे. 



 

Web Title: 3 dead as strong quake hits Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.