२६ जुळी मुले पुढील महिन्यात जाणार शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:38 AM2017-08-17T04:38:33+5:302017-08-17T04:38:53+5:30

स्कॉटलंडमध्ये पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये जुळी २६ मुले शाळेत दाखल होतील.

26 twin students going to school next month | २६ जुळी मुले पुढील महिन्यात जाणार शाळेत

२६ जुळी मुले पुढील महिन्यात जाणार शाळेत

googlenewsNext

स्कॉटलंडमध्ये पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये जुळी २६ मुले शाळेत दाखल होतील. गंमत म्हणजे इन्व्हरक्लाइड कॉन्सिल शाळेत एकूण १६४ जुळ््यांचे शिक्षण सुरू होईल. केंडल आणि स्की या पाच वर्षांच्या जुळ््या मुलींची आई अर्लिन्स कैर्न्स म्हणाल्या की,‘‘माझ्या मुली सारख्या दिसत नाहीत. एकीचे केस लाल तर दुसरीचे बदामी रंगाचे आहेत. एकीचे डोळे बदामी तर दुसरीचे निळे. येथील पाण्याचाच काही तरी गुण असावा, असे स्थानिकांना वाटते कारण गेल्या वर्षी यंदापेक्षाही जास्त जुळे होते.’’
इन्व्हरक्लाइड कॉन्सिलचे शिक्षण निमंत्रक जिम क्लोकेर्टी म्हणाले की,‘‘एक हजार जन्मांमध्ये जुळ््यांचा दर १८ टक्के आहे. ही सरासरी स्कॉटीश सरासरीपेक्षा (एक हजार जन्मामागे १५) जास्त आहे. आमची सरासरी देशात जास्त असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.’’ बालवाडीतून प्राथमिक शाळेत दरवर्षी लक्षणीय संख्येने जुळी भावंडे जातात याचेच मला आश्चर्य वाटत असताना ही संख्या यावर्षी दुपट्ट झाली, असे मार्टिन ब्रेन्नान म्हणाले.

Web Title: 26 twin students going to school next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.