राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  मीन
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी-व्यवसायातून आवक वाढणार आहे. जूनी येणी वसूल होतील.भावंडांविषङ्मी काळजी वाटेल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. प्रतिष्ठीत बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांत चांगले यश मिळेल. शुभदिनांक २६
modipoll

Live News