राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  कुंभ
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
अपेक्षित पत्रव्यवहार होतील. पूर्वनिङ्मोजित प्रवास काही कारणाने रद्द करावे लागतील. भावंडांशी सुसंवाद साधाल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. ध्यानधारणेत प्रगती होईल. पुढे घडणाऱ्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. महिलांनी जपजाप्याकडे जास्त लक्ष द्यावे. आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. शुभदिनांक २४,२५
modipoll

Live News