राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  मकर
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन चांगले अर्थाजन करता येईल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे सोपे होईल. उधारी उसनवारी वसूल होईल. ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. हुशारीने अनेक गोष्टी यशस्वीपणे साध्य कराल. मनासारखे कौटुंबिक सौख्य मिळाल्याने समाधान लाभेल. महत्त्वाच्या निर्णयातील आपला पुढाकार कुटुंबियांना आधार देणारा राहील. जवळच्या नातलगाबद्दल हळवे बनाल. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील. आशावादी धोरणाचा अवलंब केलात तर आपले ध्येय गाठणे शक्य होईल. अनुत्तरीत प्रश्न सुटतील. कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. परप्रांताशी आपले व्यावसायीक संबंध सुधारण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. शुभदिनांक २८,१

Live News