राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  धनु
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
ग्रहमान प्रॉप्रर्टी, गुंतवणुकीसाठी चांगले आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होईल. घरातील सुुखसुविधा वाढविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. उंची वस्त्रालंकार खरेदी केले जातील. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. नावीण्यपूर्ण घडामोडी घडतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नवीन व्यावसायिक करार घडतील.आध्यात्मिक विषयांवर हातून लिखाण होईल. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल.आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. आपल्या इच्छा कृतीत येतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.

Live News