राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  वृश्चिक
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या ओळखीतून लाभ होतील. कोणतीही प्रतिक्रिया तीव्रतेने व्यक्त करु नका. जवळच्या व्यक्तीबद्दल हळवे बनाल. खेळाडूंना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. अनोळखी माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. एखादी चांगली बातमी कळेल व घरातील वातावरण आनंददायी होईल. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योेग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. सप्तमस्थ गुरुमुळे विवाहेच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल.

Live News