राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  कन्या
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
कन्या : अंधश्रद्धेला बळी पडू नका. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने मात कराल. प्रवासात काही कारणाने त्रास संभवतात. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. प्रत्येक पाऊल सावधतेने उचलले़ तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आशेचा नवीन किरण दिसेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. उद्योग, व्यापार विशेषत: मौल्यवान तसेच गृहसुशोभीकरण करण्याच्या वस्तूंचा व्यापार उत्तम चालेल. मनोबल वाढेल. वेगाने कार्यरत राहाल.आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. शुभदिनांक २७,२८

Live News