राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  सिंह
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
जोडीदाराचा उत्कर्ष करणारे राहील. जोडीदाराशी सुसंवाद साधलात तर महत्त्वाची कामे सहजतेने पार पाडण्यात यशस्वी व्हाल. तसेच तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. आपण आव्हानात्मक कामे स्वीकारुन यशस्वी करुन दाखविणार आहात. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. आशावादी धोरण स्वीकारा. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते. कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. उत्तरार्धात प्रकृतीच्या जून्या तक्रारी डोके वर काढतील. सत्संग लाभेल. सध्या थोडा तणावाचा काळ आहे पण म्हणून करीयरकडे दुर्लक्ष करु नका. नव्या उमेदीने कामाला लागाल. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

Live News