राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  वृषभ
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल.विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. व्यवसायात अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.उत्तरार्धात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. शुभदिनांक २६,२७
Pandharpurwari

Live News