XMan Hugh Jackman alerted fans! | एक्समॅन ह्यू जॅकमॅनने केले चाहत्यांना अलर्ट!!

हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमॅनने सोशल मीडिया साइट्सवर त्याच्या खासगी माहितीचा दुरूपयोग करून त्याचे रूप धारण करणाºया बहुरूपीपासून सावध राहण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. जॅकमॅनने ट्विट केले की, ‘मला माहिती आहे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर माझे रूप धारण करणारे बरेचसे बहुरूपी सक्रिय आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, त्यांना तुमची व्यक्तिगत माहिती किंवा पैसे देऊ नका. जॅकमॅनने पुढे लिहिले की, प्रत्येक साइटवर माझ्या अधिकृत अकाउंटसमोर निळ्या रंगाचे चिन्ह आहे. मी या लोकांचा चेहरा उघड करण्याचा प्रचंड प्रयत्न करीत आहे. त्यावर सध्या माझे काम सुरू आहे. त्यासाठी मला मॅसेज पाठविणाºयांचे आभार. 
 
दरम्यान, ह्यू जॅकमॅनने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मला ‘आयरन मॅन, हल्क आणि वूल्विरन’ हे तिन्ही चित्रपट एकत्र बघावयाला आवडेल. वास्तविक जॅकमॅनचेच म्हणणे आहे की, त्याला वूल्विरनची भूमिका पुन्हा साकारायची नाही. गेल्यावर्षी जेम्स मॅनगोल्डच्या ‘लोगन’मध्ये त्याने वूल्विरनची भूमिका साकारली होती. दरम्यान, ह्यू जॅकमॅनला एक्समॅन या नावाने ओळखले जाते. चाहत्यांमध्ये तो या नावाने जबरदस्त लोकप्रिय आहे. विशेषत: लहान मुले त्याच्या या भूमिकेमुळे खूपच प्रभावित आहेत. 
Web Title: XMan Hugh Jackman alerted fans!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.