‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:17 PM2018-09-21T12:17:43+5:302018-09-21T12:28:12+5:30

प्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

who is this Hot actress from Nick Jonas' Family? and her relation with Priyanka Chopra,See Pics | ‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला

‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून सिनेमांपेक्षा प्रियंका चोप्रा तिच्या आयुष्यातील खाजगी गोष्टींमुळेच जास्त चर्चेत आहे. बॉयफ्रेंड निक जोनासह झालेला साखरपुडापासून ते त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात सध्या तिच्या चाहत्यांमध्ये जास्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता पर्यंत प्रियंकाचा बॉयफ्रेंड निक जोनास आणि प्रियंकाचे लग्न यांवर चर्चा रंगत होत्या. यातच आता प्रियांका चोप्राची मोठी जाऊ चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंकाच्या जाऊचे सेक्सी, हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा. तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रिंयकाच्या जाऊचे नाव डेनियल जोनास असं आहे. 

 

 

 


प्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणारी डेनियल अमेरिकन टिव्ही अभिनेत्री आहे. निकचा मोठा भाऊ पॉल केविन जोनासने डेनियलसह 2009 मध्ये लग्न केले होते. यांना एलिना जोनास आणि एंजेलिना जोनास असे दोन मुलंही आहेत.

 

विशेष म्हणजे प्रियंकाची जाऊही प्रियंकापेक्षा लहान आहे. प्रियंका 36 वर्षाची आहेत तर डेनियल 32 वर्षाची आहे. आपल्या बोल्ड  फोटोंमुळे डेनियल जोनासचीही आता नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. सोशल मीडियावरही डेनियल बरीच अॅक्टिव्ह असून तिचे  1 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. आजवर तिने स्वतःचे ६००हून अधिक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

निक प्रियंकाच्या बाबतीत जास्त पझेसिव्ह असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळतं. आपल्या लेडी लव्हला गर्दीत कोणामुळे त्रास होवू नये याचीही तो खूप काळजी घेतो. ते दोघेही सतत एकमेकांसह वेळ घालवताना दिसतात. भारतात आल्यानंतर जिथे प्रियंका जाते तिथे निकही तिच्याबरोबर जातो. त्यामुळे  भारतात सध्या प्रियंका बरोबरच निकच्याही जोरदार चर्चा रंगतात. लग्न सोहळा असेल, पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले. 

Web Title: who is this Hot actress from Nick Jonas' Family? and her relation with Priyanka Chopra,See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.