प्रसिद्ध अमेरिकी रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरने ‘जीक्यू’ साप्ताहिकासाठी नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. या साप्ताहिकासाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे कायली चर्चेत असून, सोशल मीडियावर या फोटोंनी धूम उडवून दिली आहे. बोल्डनेसच्या सर्वच परिसीमा पार करताना कायलीने घायाळ करणाºया अदा या फोटोशूटमधून दाखविल्या आहेत. त्यामुळे सध्या ती जबरदस्त चर्चेत आली आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् कायलीने इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून, त्यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे. जीक्यू मॅक्सिकोसाठी करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये कायली ग्रे कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. १९ वर्षीय कायली सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. ती सातत्याने तिचे बोल्ड फोटोज् अपलोड करून चर्चेत राहत असते. आता कायलीने पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड अवतार दाखविल्याने सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी वातावरण गरम केले आहे. 

इन्स्टाग्रामवर कायलीच्या फॅन फॉलोअर्सची संख्या ९५.८ मिलियन आहे. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, तिचे हे फोटो किती मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. कायलीने वयाच्या नवव्या वर्षीच ‘किपिंग अप विथ द कर्दाशियन’ या प्रसिद्ध टीव्ही सिरीजमध्ये अभिनय केला. पुढे तिने अभिनयाबरोबरच मॉडलिंगलाही सुरुवात केली. आज कायली टीव्ही जगतात प्रसिद्ध असून, मॉडलिंग क्षेत्रातही तिने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. त्याव्यतिरिक्त सोशल मीडियावरही कायलीचा निर्विवाद दबदबा असल्याचे दिसून येते. टाइम्स साप्ताहिकाने तर कायलीला २०१४/१५ साठी तिला ... या अवॉर्डने सन्मानित केले होते. कायली सध्या प्रसिद्ध रॅपर ट्रेविस स्कॉट याला डेट करीत आहे. 
Web Title: View Pics: Bold Photoshoot done for 'GQ' Weekly!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.