जॉनी डेपने कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या फॅन्सचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 03:39 PM2017-01-22T15:39:35+5:302017-01-23T11:22:29+5:30

अभिनेत्री एंबर हर्ड हिला नुकताच घटस्फोट देणारा अभिनेता जॉनी डेप याने त्याला या कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या फॅन्सचे जाहीर ...

Thanks to Johnny Depp in the face of difficult situations, thanks to the fans | जॉनी डेपने कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या फॅन्सचे मानले आभार

जॉनी डेपने कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या फॅन्सचे मानले आभार

googlenewsNext
िनेत्री एंबर हर्ड हिला नुकताच घटस्फोट देणारा अभिनेता जॉनी डेप याने त्याला या कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या फॅन्सचे जाहीर आभार मानले आहेत. पीपुल्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारच्या रात्री पीपुल्स चॉइस अवॉर्ड स्वीकारताना त्याने दिलेल्या भाषणात फॅन्सचे जाहीर आभार मानत असेच प्रेम असू द्या, असे आवाहनही केले. 

जॉनी डेप याला त्याच्या एका सिनेमासाठी आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी बोलताना तो म्हणाला की, या सोहळ्यासाठी मी फक्त तुमच्यासाठी आलो आहे. कारण तुम्हीच मला माझ्या कठीण प्रसंगात धीर दिला आहे. जगभरातील माझे फॅन्स माझ्यासोबत असल्यानेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला विश्वास आहे की, तुमचे हे प्रेम माझ्यावर कायम असणार आहे. तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी मोलाची असून, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा जाहीर आभार मानतो. धन्यवाद!



जॉनी डेप आणि एंबर हर्ड
जॉनी डेपची पत्नी एंबर हर्ड हिने त्याच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. घरगुती हिंसाचार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मे २०१६ मध्ये एंबर हर्डने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. अखेर १३ जानेवारी रोजी त्यांचा घटस्फोट मंजूर झाला असून, ते कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत. 

सध्या दोघेही त्यांचे आयुष्य जगत असून, एंबर हर्ड एका व्यावसायिकाला डेट करीत असल्याचीही माहिती समोर येत आहे, तर जॉनी डेप अद्यापही या प्रकरणातून सावरलेला नसताना दिसत आहे. पीपुल्स चॉइस अवॉर्ड सोहळ्यात हे अधोरेखितही झाले आहेत, पण काहीही असो जॉनी डेपचे फॅन्स अखेरपर्यंत त्याच्यासोबत असतील यात शंका नाही. 

Also Read : एंबर हर्ड करीत आहे एका व्यावसायिकाला डेट

Web Title: Thanks to Johnny Depp in the face of difficult situations, thanks to the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.