ठळक मुद्देस्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टेन ली यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टेन ली यांनी सोमवारी वयाच्या ९५  व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.१९६१ मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. यात स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. 

आज आपण स्टेन ली यांच्या अशाच काही पात्रांबद्दल जाणून घेणार आहोत...
ब्लॅक पँथर


अमेरिकन कॉमिक बुक्सच्या इतिहासात ब्लॅक पँथर पहिला ब्लॅक सुपरहिरो आहे. मार्वलच्या जगात याला सर्वात स्मार्ट आणि श्रीमंत सुपरहिरो म्हटले जातात. ब्लॅक पँथरचा पहिले पात्र सर्वप्रथम ‘फेन्टास्टिक4’मध्ये दिसले. २०१८ मध्ये ब्लॅक पँथर हा हॉलिवूडपटही रिलीज झाला होता.

द हल्क


१९६२ मध्ये स्टेन ली आणि जॅक किर्बी यांनी मिळून द इनक्रेडिबल हल्क प्रकाशित केले. कॉमिक्समध्ये हे पात्र दोन वेगळ्या अवतारात होते. एक हिरव्या अवाढव्य शरिराचे. ज्याच्याकडे अद्भूत शक्ती आहे आणि दुसरे ब्रुस बॅनर, जो शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे.

आयर्न मॅन


१९६८ मध्ये मार्वल कॉमिक्सने आयर्न मॅन कॉमिक बुकच्या सीरिजचा पहिला भाग प्रकाशित केला. टेल्स आॅफ सन्सेन्समध्ये सर्वप्रथम आयर्न मॅनचे पात्र दाखवण्यात आले. २००८ मध्ये आयर्न मॅनवर चित्रपट बनला.

एक्स मॅन


स्टेन ली आणि जॅक किर्बीने मिळून १९६३ मध्ये या पात्राला जन्म दिला. एक्स मॅन ही काल्पनिक सुपरहिरोची टीम आहे. मॉर्वल कॉमिक्सच्या सर्वाधिक यशस्वी कॉमिक्समध्ये एक्स-मॅन एक आहे. या पात्रावर आधारित ११ चित्रपट रिलीज झाले आहेत.

स्पायडर मॅन


मार्वलचा सर्वाधिक लोकप्रीय सुपरहिरो म्हणजे, स्पायडर मॅन. या कॉमिक बुकने सर्वाधिक कमाई केली. ही सीरिज स्टेल ली आणि स्टीव डिटको यांनी लिहिली होती. १९६२मध्ये सर्वप्रथम प्रकाशित कॉमिक बुकमध्ये स्पायडर मॅनचे पात्र रंगवले गेले होते. या कॉमिक बुक आणि पात्रावर नंतर चित्रपट, अ‍ॅनिमेशन शो, व्हिडिओ गेम्सही आलेत.
 


 


Web Title: stan lee created superheroes here most popular character
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.