Like the sisters, this actress is going to marry without her marriage! | आपल्या बहिणींप्रमाणेच ‘ही’ अभिनेत्री लग्न न करताच होणार आई!

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिची बहीण कायली जेनर सध्या गर्भवती असून, तीदेखील बहिणींप्रमाणेच लग्न न करता आई होणार आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल असलेली कायली बॉयफ्रेंड ट्रॅविस स्कॉट याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहते. परंतु कायलीचा ट्रॅविससोबत लग्न करण्याची सध्या कुठलाही विचार नाही. त्यामुळे ती अविवाहितपणातच आई होणार आहे. वास्तविक कायली आणि ट्रॅविसला लग्नासाठी आणखी काही वेळ हवा आहे. आयएनएसने टीएमजेड वेबसाइटचा हवाला देताना म्हटले की, कायली आणि स्कॉटच्या जवळच्या सूत्रांनुसार, दोघांनाही असे वाटत आहे की त्यांनी अद्यापपर्यंत एकमेकांना पुरेसे समजून घेतले नाही. त्यामुळे विवाहाच्या बंधनात अडकण्याची त्यांना काहीही घाई नाही. सूत्रानुसार, दोघेही त्यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी सकारात्मकतेच्या शोधात आहेत. सूत्रांनी सांगितले की, कायलीला लग्नाअगोदरच आई होण्यास काहीही वावगे वाटत नाही. तिला असे वाटते की, तिचा निर्णय बहीण किम कर्दाशियां आणि कर्टनी कर्दाशियां यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा आहे. यांची चौथी बहीण ख्लोए कर्दाशियां हीदेखील तिन्ही बहिणीप्रमाणेच लग्न न करता आई होण्याचा विचार करीत आहे. दरम्यान, कायली आणि ट्रॅविस स्कॉट लग्नाबाबत सध्या कुठलीही चर्चा करू इच्छित नाहीत. उलट जन्माला येणाºया मुलीविषयी कायली अधिक विचार करीत आहेत. सूत्रानुसार हीदेखील माहिती समोर येत आहे की, या मुलाला जन्म देण्यासाठी केवळ कायलीच सकारात्मक आहे, तर ट्रॅविस स्कॉट म्हणावा तेवढा याबाबत आनंदी नाही.  असो, सध्या तिन्ही कर्दाशियां बहिणी (ख्लोए, किम आणि कायली) गर्भवती आहेत. किमदेखील लग्नापूर्वीच आई झाली होती. आता कायली आणि ख्लोए तिच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. ख्लोए सध्या गर्भवती असून, एनबीए स्टार ट्रिस्टन थॉम्प्सन तिचा बॉयफ्रेंड आहे. खरं तर कर्दाशियां परिवार जगभरात त्यांच्या बोल्डनेससाठी ओळखला जातो. त्यांचे बोल्ड फोटोशूट, टीव्ही शो आणि मॉडलिंगचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. याच कारणामुळे हा परिवार कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.  
Web Title: Like the sisters, this actress is going to marry without her marriage!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.