Shocking: Priyanka Chopra's Hollywood movie leaked; Desi Girl Looks Into That Depth !! | Shocking : प्रियंका चोपडाच्या हॉलिवूडपटाचा सीन झाला लिक; नको त्या अवस्थेत दिसत आहे देसी गर्ल!!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवित आहे. तिला एकापाठोपाठ एक हॉलिवूडपटांच्या आॅफर्स मिळत असल्याने प्रियंका बॉलिवूडपटांमध्ये फारच कमी झळकेल हे आता सिद्ध झाले आहे. अभिनेता ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन यांच्याबरोबर ‘बेवॉच’मध्ये झळकल्यानंतर प्रियंका ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा तिचा तिसरा हॉलिवूडपट आहे. कारण ‘बेवॉच’नंतर तिने ‘अ किड लाइक जेक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. दरम्यान ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटाच्या शूटिंगचा एक सीन आॅनलाइन लिक झाला असून, त्यामध्ये प्रियंका नको त्या अवस्थेत दिसत आहे. 

दोन दिवसांपूर्वी प्रियंकाने तिच्या तिसºया हॉलिवूडपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सध्या या चित्रपटाचे शूटिंगही जोरदार सुरू आहे. अशाच सेटवरील एक सीन आॅनलाइन लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. डेल मेलच्या हाथी लागलेल्या या व्हिडीओमध्ये प्रियंका आणि चित्रपटाचा अभिनेता एडेम नको त्या अवस्थेत दिसत आहेत. सीनमध्ये प्रियंका एका टेबलवर बसून जेवण करीत असते; मात्र खाताना अचानकच तिच्या गळ्यात काही तरी अडकते. तिला काहीच सूचत नाही. तेवढ्यात अभिनेता एडेम त्याठिकाणी येतो आणि तिला मदत करतो; मात्र दोघे ज्या पद्धतीने हा सीन करतात त्यात ते खूपच विचित्र स्थितीत बघावयास मिळतात. खरं तर प्रियंकाने असा सीन पहिल्यांदाच दिला असे अजिबात नाही. ‘क्वाटिंको’ या मालिकेच्या शूटिंगप्रसंगी तिने अनेक हॉट सीन्स दिले. आपल्या सहकलाकारासोबत ती बाथरूममध्ये इंटिमेट होतानाचा सीन लिक झाला होता. या सीनमध्ये प्रियंका खूपच सेक्सी अंदाजात दिसत होती. प्रियंकाचा हा सीन बघून तर बॉलिवूडकरांची बोलतीच बंद झाली होती. आता पुन्हा एकदा प्रियंकाचा अशाप्रकारचा सीन लिक झाल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका मुंबईला आली होती. यावेळी तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वाचल्या होत्या. 

ALSO READ : प्रियंका चोपडाने दुसऱ्या हॉलिवूडपटाच्या शूटिंगला केली सुरुवात !

दरम्यान, तिने कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. त्याचबरोबर ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गुस्ताखियॉँ’ या चित्रपटात झळकणार आहे. संजय लीला भन्साळी बºयाच काळापासून प्रसिद्ध साहित्यकार अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्यातील नात्यावर चित्रपट बनविण्याचा विचार करीत आहेत. आता प्रियंकाने त्यास होकार दिल्याने लवकरच या चित्रपटावर काम केले जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच इरफान खानने या चित्रपटासाठी नकार दिला होता. आता प्रियंका हा चित्रपट करणार की, ऐनवेळी नकार देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 
Web Title: Shocking: Priyanka Chopra's Hollywood movie leaked; Desi Girl Looks Into That Depth !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.