Shocking: The maker demanded 'massage' the actress! | Shocking : निर्मात्याने ‘या’ अभिनेत्रीकडे केली मसाज करून देण्याची डिमांड!!

हॉलिवूड निर्माता हार्वे वाइनस्टानवर लैंगिक शोषणाचे आरोप अजूनही केले जात आहेत. आता १९९०च्या दशकातील आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अभिनेत्री ग्वानेथ पाल्ट्रो हिने १९९० मधील एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. तिने सांगितले की, हार्वे वाइनस्टाइनसोबतचा माझा एक अनुभव अत्यंत वाइट आहे. जेव्हा मी याबाबत माझ्या बॉयफ्रेंडला सांगितले होते तेव्हा त्याने हार्वे वाइनस्टाइनला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, एका महिलेशी दुष्कर्म आणि दुसºया महिलेशी बळजबरीने सेक्स केल्याप्रकरणी हार्वेनी न्यू यॉर्क पोलिसांत आत्मसमर्पन केले आहे. याबाबतची माहिती एएनआयने दिली आहे. 

एका रेडिओ शोदरम्यान दिलेल्या मुलाखतीत ग्वानेथ पाल्ट्रोने सांगितले की, ‘मी लगेचच बॉयफ्रेंड ब्रॅड पिटला सांगितले की, वाइनस्टाइनने माझ्याकडे त्याची मसाज करण्याची डिमांड केली होती. जेव्हा आम्ही दोघे हॉटेलमध्ये होतो, तेव्हाच त्याने माझ्याकडे ही डिमांड केली होती. पुढे जेव्हा आम्ही तिघेही ब्रॉडवेमध्ये हॅमलेट बघण्यासाठी गेलो होतो तेव्हा याच कारणावरून ब्रॅड पिट आणि वाइनस्टाइनमध्ये वाद झाला होता. पिटने वाइनस्टाइनला धमकी देताना म्हटले होते की, जर त्याने पुन्हा मला त्रास दिला तर तुला जिवे मारणार. पाल्ट्रोने वाइनस्टाइनसोबत दोन चित्रपट केले आहेत. पाल्ट्रोने सांगितले की, पिटने आपल्या लोकप्रियता आणि ताकदीचा वापर मला त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी केला होता. कारण त्यावेळी मी काहीच नव्हते. माझी काहीच ओळख नव्हती. दरम्यान, वाइनस्टाइनवर आतापर्यंत ५०पेक्षा अधिक महिलांनी  लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 
Web Title: Shocking: The maker demanded 'massage' the actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.