Shocking! Jennifer Anistor and actor Justin Theroux divider! | ​Shocking! जेनिफर एनिस्टर आणि अभिनेता जस्टिन थेरॉक्स विभक्त!

हॉलिवूडचे लोकप्रीय कपल जेनिफर एनिस्टर आणि अभिनेता जस्टिन थेरॉक्स आता विभक्त झाले आहेत. होय, विवाहाच्या दोन वर्षानंतर जेनिफर  व जस्टिन यांनी आज अधिकृतपणे विभक्त होत असल्याची घोषणा केली. अर्थात दोघांनीही विभक्त होण्यामागचे कुठलेही कारण स्पष्ट केले नाही. आॅगस्ट २०१५ मध्ये ४९ वर्षांची जेनिफर आणि ४६ वर्षांचा जस्टीन दोघेही लॉस एंजिल्समध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. ‘वंडरलस्ट’ या चित्रपटाच्या सेटवर जेनिफर व जस्टिन यांची भेट झाली होती. मात्र आता दोघांच्याही वाटा कायमच्या वेगळ्या झाल्या. दोघांनीही यासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत व असू. पण दांम्पत्य म्हणून आम्ही विभक्त होत आहोत. खरे तर आम्ही अगदी खासगीत वेगळे होऊ शकलो असतो. पण आम्हा दोघांबद्दल नाहक अफवांचे पिक येऊ नये, यासाठी आम्ही आमचा निर्णय सर्वांसोबत शेअर करत आहोत. विभक्त झाल्यानंतरही आमच्यातील मैत्री, एकमेकांप्रतिचा आदर कायम असेल, असे दोघांनीही आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिले आहे.

जेनिफरचे हे दुसरे लग्न होते. याआधी तिने अभिनेता ब्रँड पिटसोबत लग्न केले होते. मात्र २००५मध्ये ब्रँड पिट व जेनिफर दोघांनीही घटस्फोट घेतला. १९९० च्या दशकात ‘फ्रेन्ड्स’ या अमेरिकन टीव्ही मालिकेने जेनिफरला लोकप्रीयता मिळवून दिली. यातील तिने साकारलेली रेचल ग्रीनची भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर ती हॉलिवूड चित्रपटांकडे वळली. शी इज वन, आॅफिस स्पेस, द गुड गर्ल, फ्रे्न्ड्स विथ मनी अशा अनेक चित्रपटात ती दिसली. जस्टीन थेरॉक्स हा अभिनेत्यासोबतच निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक म्हणूनही ओळखला जातो.  
Web Title: Shocking! Jennifer Anistor and actor Justin Theroux divider!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.