SHOCKING !! 'Golden Globes' Winner Indian-origin actor Aziz Ansari is accused of sexual exploitation! | SHOCKING!! ‘गोल्डन ग्लोब्स’ विजेता भारतीय वंशाचा अभिनेता अजीज अन्सारीवर लैंगिक शोषणाचा आरोप!

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब्स अवार्ड जिंकणारा भारतीय वंशाचा अभिनेता अजीज अन्सारी वादात सापडला आहे. होय, ब्रुकलिनच्या एका २३ वर्षीय महिला फोटोग्राफरने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या महिला फोटोग्राफरच्या आरोपामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
महिला फोटोग्राफरने केलेल्या आरोपानुसार, ती आणि अन्सारी २०१७ मध्ये एॅमी अवार्डनंतरच्या एका पार्टीत भेटले होते. तिने आपली ही सगळी आपबीती सांगितली आहे.
तिने सांगितले की, मी व अन्सारी एका पार्टीत भेटलो होतो. पहिल्याच भेटीत आम्हाला एकमेकांची कंपनी आवडली आणि परस्परांना डेट करायला लागलो. एकदिवस त्याने मला न्यूयॉर्क सिटीतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये बोलवले. येथे गेल्यावर मी अनेकदा नकार देऊनही त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचे प्रयत्न केलेत. तो ओरल सेक्स करण्यासाठी मला आग्रह करत होता. मी यासाठी तयार नाही, सहज नाही, हे मी त्याला सांगत होते. पण माझे एक न एकता तो माझ्यावर सेक्स करण्यासाठी बळजबरी करत होता. त्याच्या घरात टीव्ही सुरु होता. माझा आवाज न ऐकता तो मला किस करण्याचा प्रयत्न करत होता. मी कशीबशी त्याच्या कचाट्यातून सुटले व कॅब करून माझ्या घरी पोहोचले. त्या रात्री मी ठार जागे होते. त्याचवेळी मी अजीजला एक मॅसेजही केला होता. डिनर डेटवर जे काही झाले ते तुझ्यासाठी फन मोमेंट असेल. माझ्यासाठी नाही, असे मी त्याला लिहिले होते. त्यानेही माझ्या या मॅसेजला उत्तर दिले होते. कदाचित मी डिनर डेटवर झालेल्या सर्व गोष्टींना चुकीने घेतले. जे काही झाले त्यासाठी मी माफी मागतो, असे त्याने मला लिहिले होते.
तुम्हाला ठाऊक असेलच की, गोल्डन ग्लोब अवार्ड्समध्ये भारतीय वंशाचा अजीज अन्सारी याला ‘द मास्टर आॅफ नन’ या टीव्ही सीरिजसाठी म्युझिकल कॉमेडी कॅटेगरीत बेस्ट अ‍ॅक्टरच्या अवार्ड्सने गौरवण्यात आले होते. अजीज अन्सारीचा जन्म कोलंबियात एका तामिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचे कुटुंब मूळचे भारताच्या तामिळनाडूचे आहे.

Web Title: SHOCKING !! 'Golden Globes' Winner Indian-origin actor Aziz Ansari is accused of sexual exploitation!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.