Shocking: 'The actress said,' The producer had made me stand in a queue with nude '! | Shocking : ‘या’ अभिनेत्रीने म्हटले, ‘प्रोड्यूसरने मला नग्नावस्थेत रांगेत उभे केले होते’!

प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिने इंडस्ट्रीतील तिचे संघर्षाचे दिवस स्मरण करताना अतिशय थरारक असा किस्सा सांगितला. जेनिफरने म्हटले की, ‘एका प्रोड्यूसरने मला बिगर कपड्यांचेच दुसºया अभिनेत्रींबरोबर उभे करून माझा अपमान केला होता. जेनिफरने या कडू आठवणी एले वुमन प्रोग्रॅममध्ये सांगितल्या. त्यावेळी जेनिफरने हॉलिवूडमध्ये नुकतीच तिच्या करिअरला सुरुवात केली होती. ती एका चित्रपटात काम करीत होती. मात्र निर्मात्यांना तिचे वजन खटकत होते. त्याने तिला सज्जड दम भरताना म्हटले होते की, मला पुढील दोन आठवड्यांमध्ये तुझे पंधरा पाउंड वजन कमी हवे आहे. मात्र एवढ्या कमी वेळात वजन कमी करणे शक्य नसल्याने मला या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. 

जेनिफरने या आठवणी सांगताना म्हटले की, ‘त्यावेळी मला त्या महिला प्रोड्यूसरने नग्न अवस्थेत अन्य पाच अभिनेत्रींसोबत उभे केले. त्या सर्व अभिनेत्री माझ्या तुलनेत खूपच सडपातळ होत्या. आम्ही सर्व लोक एकापाठोपाठ उभे होतो. हा माझ्यासाठी खूपच अपमानित करणारा अनुभव होता. जेनिफर लॉरेंसला एले वुमन सेरेमनीमध्ये सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना जेनिफर म्हणाली की, ‘हा खूपच अपमानजनक आणि दु:खदायक अनुभव होता. कारण त्या प्रोड्यूसरने मला म्हटले होते की, तू तुझे नग्न फोटो बघून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी की, तुला वजन कमी करायचे की वाढवायचे.’ पुढे जेनिफर दुसºया एका प्रोड्यूसरकडे कामासाठी गेली, मात्र त्याठिकाणीदेखील तिला अपमानस्पद वागणूक मिळाली. लॉरेंसच्या मते, ‘दुसºया प्रोड्यूसरने तिला म्हटले होते की, मला कळत नाही की लोक तुला स्थूल का म्हणतात. माझ्या मते तुझी बॉडी फिट आहे.’ अर्थात हे सर्व ते खिल्ली उडविण्यासाठी म्हणत होते. कारण त्यानंतर त्यांनी माझ्या शरीरावरून असा काही शब्दप्रयोग केला की, मला खूपच अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यावेळी माझ्यात स्वत:बद्दल खूपच दुर्बल असल्याची भावना निर्माण झाली होती. पुढे मी निर्धार करून वजन कमी केले. शरीराला ग्लॅमरच्या दुनियेला अपेक्षित असलेला आकार दिला. अर्थात याकरिता मला खूप संघर्ष करावा लागल्याचेही जेनिफरने म्हटले. 
Web Title: Shocking: 'The actress said,' The producer had made me stand in a queue with nude '!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.