पती ब्रॅड पिट याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली अधिकृतरीत्या तिच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. अ‍ॅँजेलिनाने लॉस एंजेलिस येथे तब्बल २.५ कोटी डॉलरचे घर खरेदी केले असून, गेल्या गुरुवारी या घरासमोर काही ट्रक उभे असल्याचे दिसून आले. एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, हे आलिशान घर कधीकाळी दिग्गज चित्रपट निर्माते सेसिल बी डिमिली यांचे होते. आॅनलाइन व्हायरल झालेल्या एका फोटोनुसार गेल्या गुरुवारी अनेक बॉक्सेस आणि पेट्या ठेवल्या जात होत्या. त्यानुसार अ‍ॅँजेलिना या घरात शिफ्ंिटग करीत असावी असा कयास लावला जात आहे. या घरात एक टी हाउस, मोठे गार्डन, स्विमिंग पूल यांसह सहा बेडरूम्स् आणि १० बाथरूम्स आहेत. त्याशिवाय एक चांगली लायब्रेरी आणि एक जुने फार्महाउस किचनही आहे. सूत्रानुसार अ‍ॅँजेलिनाने हे घर खरेदी केले असून, तिच्या सहा मुलाना ब्रॅड पिटला भेटता यावे या मुख्य कारणास्तव हे घर खरेदी केले आहे. ब्रॅड पिट या घरापासून केवळ दोन मैलाच्या अंतरावर राहतो. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अ‍ॅँजेलिनानेच हा निर्णय घेतला की, एकमेकांच्या जवळ राहिल्यास मुलांना त्यांना (ब्रॅड पिट) भेटणे शक्य होईल. कारण दोघांनीही हा निर्णय घेतला की, मुलांना भेटणे सहज शक्य व्हायला हवे. याच कारणामुळे अ‍ॅँजेलिनाने हे आलिशान घर खरेदी केले असून, सध्या घरात शिफ्टिंगचे काम सुुरू आहे. दरम्यान, अ‍ॅँजेलिना आणि ब्रॅड यांचा घटस्फोट झाला असला तरी, मुलांमुळे दोघांना एकमेकांचा सामना आजही करावा लागत आहे. 


Web Title: SEE PICS: Angelina Jolie purchased Elizabeth House after splitting with Brad Pitt!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.