हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना नेहमीच रेड कार्पेटवर तिच्या डेयरिंग फॅशनमुळे चर्चेत असते. काल जेव्हा ती तिच्या 'Valerian and the City of a Thousand Planets' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पोहचली, तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. रिहानाचा अंदाज असा काही होता की, बघणारे दंग झाले. ती खूपच बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटिफुल दिसत होती. रिहानाने परिधान केलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला. नेहमीप्रमाणे रिहानाचा हा सेक्सी अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पॅरिस येथे प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. ब्लू कार्पेटवर रिहाना पिंक लो-कट ड्रेसमध्ये अवतरली होती. या ड्रेसवर तिने गोलाकार हाय हील्स घातल्या होत्या. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या कानातील डायमंड इयररिंग्सने चार चॉँद लावले होते. रिहानासोबत या चित्रपटातील तिची को-स्टार किरा हीदेखील यावेळी उपस्थित होती. परंतु किरापेक्षा रिहानाकडेच सर्वांच्या नजरा होत्या. वास्तविक रिहानाविषयी असे पहिल्यांदा घडत आहे, असे अजिबातच नाही. कारण ती नेहमीच तिच्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. इंटरनॅशनल मीडियात रिहानाच्या या लुकची खूप चर्चा रंगली. या अगोदर रिहाना लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये रेड गाऊन घालून पोहोचली होती. त्या गाऊनमधील तिचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच घायाळ करणारा होता. त्यावेळी तर तिच्या या लुकमुळे हॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. स्कार्लेट रेड गाऊनमध्ये रिहाना खूपच सेक्सी दिसत होती. रेड लिपस्टिक आणि डायमंड ज्वेलरीत तिचे रूप खुलून दिसत होते. तिच्या अदा घायाळ करणाºया होत्या. वास्तविक रिहानाने या दोन्ही इव्हेंटमध्ये परिधान केलेले ड्रेस बघून असे वाटत होते की, ती नक्कीच वार्डरोब मालफंक्शनला बळी पडू शकेल. परंतु रिहाना ज्या पद्धतीने प्रत्येक प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे गेली, त्यावरून तिचे कौतुकच व्हायला हवे. दरम्यान या चित्रपटाविषयी बोलताना रिहानाने म्हटले की, व्हिजुअली थ्रिलर चित्रपटासाठी मी खूपच उत्साहित असते. आता रिहानाचा हा चित्रपट काय कमाल करेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 
Web Title: SEE HOT PICS: Rihanna's bold look in Paris premiere!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.