Rapper Jon James dies at 34 dies during an airplane stunt while filming a music video | विमानाच्या पंखावर स्टंट करत होता कॅनडाचा रॅपर, हजारो फुट उंचीवरून पडून मृत्यू
विमानाच्या पंखावर स्टंट करत होता कॅनडाचा रॅपर, हजारो फुट उंचीवरून पडून मृत्यू

कॅनडाचा लोकप्रीय गायक आणि रॅपर जॉन जेम्स मॅकमुरेय याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, एक म्युझिक व्हिडिओ शूट करताना विमानाच्या पंखावरून पडून जॉनचे निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार, जॉन एका म्युझिक व्हिडिओचे शूट करत होता. यासाठी विमानाच्या पंखावर उभा राहून गात असताना अचानक त्याचे संतुलन बिघडले आणि हजारो फूट उंचावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. जॉन हा ३४ वर्षांचा होता.

View this post on Instagram


जॉन हा त्याच्या गाण्यांसोबतच धोकादायक, चित्तथरारक स्टंटसाठीही ओळखला जायचा. त्याच्या मॅनेजरने जॉनच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मॅनजरने सांगितले की, जॉन विमानाच्या पंखांवर स्टंट करत होता. पण चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे त्याचे संतुलन बिघडले. यादरम्यान पायलटने विमानाचे संतुलन राखण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत जॉनचा विमानाला पकडलेला हात निसटला. त्याने पॅराशूटही घातले होते़ पण ते वेळीच न उघडल्याने ही दु:खद घटना घडली. तूर्तास पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Web Title: Rapper Jon James dies at 34 dies during an airplane stunt while filming a music video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.