Priyanka Chopard started shooting for the second Hollywood movie! | प्रियंका चोपडाने दुसऱ्या हॉलिवूडपटाच्या शूटिंगला केली सुरुवात !

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच रमलेली दिसत आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणाºया प्रियंकाने अल्पावधीतच ‘बेवॉच’सारख्या चित्रपटात भूमिका मिळविली. या चित्रपटात ती निगेटीव्ह भूमिकेत होती. मात्र तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता प्रियंकाला दुसरा हॉलिवूडपट मिळाला असून, तिने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘इजंट इट रोमॅण्टिक’ असे तिच्या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये ती एका योग दूतची भूमिका साकारणार आहे. 

प्रियंकासोबत चित्रपटात रिबेल विल्सन, लिआम हेम्सवर्थ, एडम डिवाइन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा एक रोमॅण्टिक कॉमेडीपट आहे. प्रियंकाने याविषयी बोलताना म्हटले की, ‘न्यू लाइन सिनेमाच्या या रोमॅण्टिक कॉमेडीपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.’ दरम्यान, हा चित्रपट न्यू यॉर्क शहरातील वास्तुकार नटाली हिच्या जीवनावर आधारित आहे. नटाली नौकरीदरम्यान स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी कठिणातील कठीण काम करण्यासाठी धडपड करीत असते. मात्र अशातही तिला शहरातील उंच इमारतींचे डिझाइन बनविण्याचे काम मिळत नसून, केवळ कॉफी शॉफ आणि छोट्या मोठ्या बंगलोचे डिझाइनचे काम दिले जाते. मात्र एक दिवस तिचा सामना एका दरोडेखोराशी होतो. तो तिला बेशुद्ध करतो, मात्र जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तिला असे जाणवते की, तिचे संपूर्ण विश्वच बदलून गेले आहे. 
 

चित्रपटात विल्सन नटालीची भूमिका साकारणार आहे. लिआम हेम्सवर्थ ब्लेक एका सुंदर ग्राहकाच्या भूमिकेत असेल. एडम डिवाइन त्याच्या सर्वांत जवळच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. तर प्रियंका चोपडा इसाबेल नावाच्या एका योग अ‍ॅम्बेसिडरच्या भूमिकेत असेल. स्ट्राउस-स्चुल्सन या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. चित्रपटाची कथा एरिन कार्डिलो, डाना फॉक्स, केटी सिल्बरमन आणि पाउला पेल यांनी लिहिली आहे. चित्रपटाची शूटिंग न्यू यॉर्क आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात केली जाणार आहे. 

हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाला वार्नर ब्रॉज पिक्चर्सतर्फे जगभरात डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहे. वार्नर ब्रॉज पिक्चर्स वार्नर ब्राज इंटरटेनमेंटचा भाग आहे. दरम्यान, प्रियंकाला दुसºया  हॉलिवूडपटाची आॅफर मिळाल्याने ती आनंदी आहे. त्याचबरोबर ती मधल्या काळात बॉलिवूडमधील काही प्रोजेक्टवरही काम करण्याची शक्यता आहे. 
Web Title: Priyanka Chopard started shooting for the second Hollywood movie!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.