हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्यावर अनेकजण जीव ओवळतात. जगभर तिचे कोट्यवधी चाहते आहे. पण अँजेलिनाची जगातील सर्वांत मोठी चाहती कोण? असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर? कदाचित या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ठाऊक नसेल. पण आम्हाला मात्र याचे उत्तर ठाऊक आहे. होय, अँजेलिनाची सर्वांत मोठी चाहती इराणमध्ये राहते. तिचे नाव आहे, सहर ताबर. सहर ताबर ही अँजेलिनाची सर्वांत मोठी चाहती आहे. याचे कारणही खास आहे. कारण, १९ वर्षीय सहरने अँजेलिनासारखे दिसायसाठी ५० वेळा स्वत:च्या चेहºयाची सर्जरी केली आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे.मी अँजेलिनाची जगातील सर्वांत मोठी चाहती आहे, हा खुद्द सहरचा दावा आहे. मी अँजेलिनासारखी दिसावी, ही माझी एकच इच्छा आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते, असे ती म्हणायची. केवळ म्हणायची नाही तर यानंतर तिने अँजेलिनासारखा चेहरा मिळवण्यासाठी स्वत:च्या चेह-यावर ५० शस्त्रक्रिया केल्यात. याशिवाय कडक डाएटही फॉलो केले. जेणेकरून तिचे वजन ४० किलोंपेक्षा अधिक होऊ नये.आपल्या या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सहरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यानंतर सहरच्या फॉलोअर्सच्या संख्येत मिनिटागणिक वाढ होते आहे. काही लोकांनी सहरने दाखविलेल्या धैर्याचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला मुर्खात काढले आहे. अनेक युजर्सला तिचा हा लुक्स भावलेला नसल्याने त्यांनी तिला ट्रोल करणेही सुरू केले आहे. काही युजर्सनी तर तिची तुलना चक्क ‘जोम्बी’शी केली आहे. तुझ्या चेहºयावर बॉम्ब पडला का? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.ALSO READ : ब्रॅड पिटनंतर अ‍ॅँजेलिना जोलीच्या जीवनात आला ‘हा’ मिस्ट्री मॅन!!

अर्थात सहरला यामुळे काहीही फरक पडत नाहीच. कारण अँजेलिनासारखे दिसणे, केवळ याचाच तिला ध्यास आहे. आता अ‍ँजेलिनासारखे दिसण्यासाठी सहर आणखी काय काय करते, ते बघूच.
Web Title: PICS: 'This' is Angelina Jolie's greatest wish! After 50 surgeries, it looks like now !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.