Pamela did re-excite the revelations | पामेलाने केला पुन्हा खळबळजनक खुलासा

हॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळख असलेल्या पामेला एंडरसन हिने पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. ‘गुड मॉर्निग’ या टीव्ही शोमध्ये तिने म्हटले की, पुरुष तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची डिमांड करतात. तिच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यापूर्वी देखील पामेलाने पुरुषांसंदर्भात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 
पामेला म्हणाली, तिने बºयाचशा अशाही पुरुषांना डेट केले ज्यांनी शारीरिक संबंध न ठेवता पोर्न दाखविण्याची डिमांड केली. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पामेला आॅनलाइन पोर्नोग्राफीचे धोके सागण्यासाठी या शोमध्ये पोहोचली होती. पामेलाने राबी श्मूली बोटीच यांच्याबरोबर ‘सेंसुअल रेवॉल्यूशन’ अभियानाची सुरूवात केली आहे. शोमध्ये तिने संगितले की, अश्लील सामुग्री सर्व वयोगटाच्या पुरुषांसाठी घातक आहे. असे असतानाही लोकांना पोर्न बघण्याचे व्यसन जडले आहे. आॅनलाइनवर पोर्नोग्राफीने अक्षरश: उच्छाद मांडल्याने याचे लोण जगभरात पोहोचले आहे. लोकांनी याचे धोके वेळीच ओळखायला हवेत. पोर्नोग्राफीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे लोकांनी याच्या आहारी जायला नको असेही ती म्हणाली. गेल्या वर्षांपासून पामेला आॅनलाइन पोर्नोग्राफी विरोधात लढा देत आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ती विविध देशांमध्ये भ्रमंती देखील करीत आहे.
स्वत:संबंधी अनेक खुलासे केल्याने पामेला नेहमीच चर्चेत राहिली आहे.  तिच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगली आहे. 
Web Title: Pamela did re-excite the revelations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.