Oscar 2019: lady gaga bradley cooper oscar performance | Oscar 2019 :  लेडी गागा आणि ब्रॅडली कूपरच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची अशी रंगली चर्चा!!
Oscar 2019 :  लेडी गागा आणि ब्रॅडली कूपरच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची अशी रंगली चर्चा!!

ठळक मुद्देऑस्कर जिंकल्यानंतर लेडी गागा अक्षरश: रडत रडत भाषण केले.

अमेरिकन सिंगर - अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला ऑस्कर  पुरस्कार मिळाला. ‘अ स्टार इज बॉर्न’ या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा फिल्ममधील लेडी गागाने गायलेल्या ‘ Shallow’ या लोकप्रीय गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग श्रेणीत ऑस्कर पुरस्काराने गौरविले गेले. जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि मानाचा ऑस्करर जिंकल्यानंतर लेडी गागा भावूक झालेली दिसली. पण यानंतर तिने ब्रॅडली कूपरसोबत दिलेल्या स्टेज परफॉर्मन्सने अख्ख्या ऑस्कर सोहळ्याला ‘चार चांद’ लावलेत.या परफॉर्मन्स दरम्यान लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री इतकी लाजवाब ठरली की, पाहणारा प्रत्येक जण भान विसरला. साहजिकचं सोशल मीडियावरही या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची चर्चा रंगली. 

अत्यंत पॅशनेट व इंटिमेट अशा या केमिस्ट्रीनंतर लेडी गागा व ब्रॅडली कूपर यांने अनेक क्लोजअप फोटो ट्रेंड करू लागलेत. जणू अख्ख्या सभागृहात आपल्याशिवाय कुणीही नाही, या भावनेने लेडी गागा व ब्रॅडली कूपर परफॉर्म करत होते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. अर्थात काही नेटकºयांनी त्यांच्या या केमिस्ट्रीवर मजेशीर कमेंट्सही दिल्यात.


ऑस्कर जिंकल्यानंतर लेडी गागा अक्षरश: रडत रडत भाषण केले. ‘हे माझ्या कष्टाचे फळ आहे. यासाठी मी प्रचंड मेहनत केली. तुमच्याकडे स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करा. तुम्हाला कितीदा नकार मिळतो, कितीदा तुम्ही पडता,ठेचाळता, हे महत्त्वाचे नसून तुम्ही कितीदा उठून उभे राहता, हे महत्त्वाचे आहे,’ असे लेडी गागा म्हणाली.

English summary :
Oscar 2019: American Singer - Actress Lady Gaga received her first career Oscar nomination. Lady Gaga's 'Shallow' from the musical romantic drama 'A Star is Born' was honored with an Oscar for Best Original Song category. Lady Gaga Bradley cooper oscar performance is one of best thing happens in the event.


Web Title: Oscar 2019: lady gaga bradley cooper oscar performance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.