Oscar 2018: Incredible trophy by thieves; Frances McDermand's weeping-tears! | Oscar 2018 : चोरट्यांनी आॅस्कर ट्रॉफी केली लंपास; फ्रान्सेस मॅक्डरमॅण्डचे रडून-रडून झाले हाल!

कला जगतात आॅस्कर हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. हा पुरस्कार मिळविणे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील अंतिम ध्येय असते. मात्र हे ध्येय सगळ्यांनाच गाठता येते असे नाही, तर मोजकेच कलाकार हा सर्वोच्च सन्मान मिळविण्यात यशस्वी ठरतात. असेच काहीसे स्वप्न उराशी बाळगून अभिनेत्री फ्रान्सेस मॅक्डरमॅण्ड हिने आपले अंतिम ध्येय गाठले. फ्रान्सेस मॅक्डरमॅण्ड हिला ‘थ्री बिलबोडर््स आउटसाइड एम्बिग मिसॉरी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीमध्ये आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेव्हा फ्रान्सेसच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु दुसºयाच क्षणी तिच्या चेहºयावरील हा आनंद दु:खात परावर्तीत झाला. होय, फ्रान्सेसला मिळालेला आॅस्कर चक्क चोरीला गेला. वास्तविक आॅस्करची बाहुली चोरीला जाणे ही काही नवीन बाब नाही. यापूर्वीदेखील अनेक अभिनेत्यांची आॅस्कर ट्रॉफी चोरीला गेली आहे. एनएआयच्या रिपोर्टनुसार, लॉस एन्जेलिस ४७ वर्षीय टॅरी ब्रायंत नावाच्या एका व्यक्तीला आॅस्करची ट्रॉफी चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की, गवर्नर्स बाल आफ्टर पार्टीदरम्यानच या चोरट्याने फ्रान्सेसची आॅस्कर ट्रॉफी चोरली असेल. रिपोर्टनुसार, ब्रायंतकडे या पार्टीत सहभागी होण्यासाठी तिकीट होते. वास्तविक यासंदर्भात अधिक माहिती समोर आली नाही. परंतु काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पार्टीच्या ठिकाणी आॅस्कर ट्रॉफी शोधण्यासाठी प्रत्येकाची झाडाझडती घेतली जात होती, तेव्हा फ्रान्सेस त्याठिकाणी रडत बसली होती. ती निर्माता पती जोएल कोएनसोबत पार्टीत सहभागी झाली होती. जेव्हा तिला आॅस्कर ट्रॉफी सोपविली तेव्हा तिच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा होता. यापूर्वी बºयाचशा कलाकारांना अशा अनुभवाचा सामना करावा लागला आहे. 
Web Title: Oscar 2018: Incredible trophy by thieves; Frances McDermand's weeping-tears!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.