दोन दिवसांपूर्वीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वार्डरोब मालफंक्शनला बळी पडलेल्या बेला हदीदची घटना ताजी असतानाच गायिका निकोल शेर्जिगर हिच्याबाबतीतही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. जेव्हा ती ‘टेलिफिल्म डर्टी डान्सिंग-२०१७’च्या प्रीमियरमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तिला या कटू अनुभवाचा सामना करावा लागला. 

एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायिका निकोल शेर्र्जिंगर सहभागी झाली होती. बॅकलेस ड्रेसमध्ये आलेली निकोल खूपच सुंदर दिसत होती. तिने एंट्री करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मात्र याच दरम्यान निकोलबरोबर असे काही घडले की, तिला सर्वांसमक्ष आपला ड्रेस सावरावा लागला. 

या टेलिफिल्ममध्ये गायिका पेनी रिवेला हिची भूमिका आहे. १९८० च्या दशकातील प्रसिद्ध टीव्ही रिमेकवर आधारित ही फिल्म आहे. या फिल्मच्या प्रीमियरमध्ये निकोल क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये आली होती. मात्र तिचा गाउन शरीराच्या वरच्या बाजूने सरकल्याने तिचे इनरवियर स्पष्टपणे दिसत होते. ही बाब निकोलच्या लक्षात आले नाही. मात्र जेव्हा तिला हे समजले तेव्हा लगेचच स्वत:ला सावरले. 

प्रीमियरमध्ये सहभागी झाल्यानंतर निकोल आफ्टर पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी टीएओ नाइटक्लब गेली. या अगोदरदेखील निकोल वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच लंडन येथे एका फॅशन वीक कार्यक्रमाच्या बाहेर पडताना कारमध्ये बसताना तिच्यावर अशाप्रकारचा प्रसंग ओढवला होता. 
Web Title: Oops: Nicole Scherzinger falls victim to wardrob manfunction!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.