'Nude' photo with Chrysanthemum removed with Crissy Tiger | क्रिसी टायजेनने काढला नवऱ्यासोबत ‘नग्न’ फोटो

ऐकावे आणि पाहावे ते नवलच! तसे पाहिले तर हॉलीवूडमध्ये नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर करणे तशी फारशी मोठी गोष्ट नाही. परंतु मॉडेल क्रिसी टायजेनने शेअर केलेला एक नग्न फोटो वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.

नवरा जॉन लेजेंडसोबत तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे ज्यामध्ये जॉन काऊचवर बसलेला असून क्रिसीने त्याच्यामागे पूर्णपणे नग्न पोझ दिली आहे. बरं हे करण्यामागे कारण जर तुम्हाला कळाले तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.

आपली मैत्रिण मरिसा मॅटिन्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्रिसीने असा न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, ‘हॅप्पी बर्थडे मरिसा मॅटिन्स’. आता अशाप्रकारे शुभेच्छा देण्याचे प्रयोजन ती जाणे आणि तिचा गायक नवरा जॉन जाणे.


आता असा ‘हॉट’ फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला नसता तर नवल! सुमारे साडेतीन लाखांपेक्षा जास्त लाईक्स त्याला मिळाल्या आहेत. अनेकांनी तिच्या अशा या बिनधास्त वृत्तीची प्रशंसा केली तरी बºयाच जणांना हा केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटला.

यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी ‘न्यूड’ फोटोज् चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत. जस्टीन बीबर, किम कार्दिशियन, मायली सायरस यांच्या नग्न फोटोजने इंटरनेटवर बरेच वादळ उठवले होते. त्यामुळे क्रिसीने जे केले त्यात नविन असे काहीच नाही, असे काहींचे म्हणने पडले.

२०१३ साली लग्न बंधनात अडकलेल्या या जोडप्याने यावर्षी एप्रिल महिन्यात आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. लुना सिमॉन स्टिफन्स असे तिचे नामकरण करण्यात आले.
Web Title: 'Nude' photo with Chrysanthemum removed with Crissy Tiger
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.