Nick Jonas's X Girlfriend says, Priyanka Chopra is not possible !! | निक जोनासची एक्स गर्लफ्रेन्ड म्हणते, प्रियांकाशी स्पर्धा शक्य नाही!!
निक जोनासची एक्स गर्लफ्रेन्ड म्हणते, प्रियांकाशी स्पर्धा शक्य नाही!!
प्रियांका चोप्रा आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या प्रेमाच्या चर्चांना बहर आला असताना निकची एक्स- गर्लफ्रेन्ड डेल्टा गुडरेम ही मात्र नाराज दिसतेय. प्रियाांका व निकच्या रोमॅन्टिक डेटचे फोटो पाहून तर डेल्टा आतून तुटली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकने स्वत: डेल्टाला त्याच्या व प्रियांकाच्या अफेअरबद्दल सांगितले. ते ऐकून डेल्टा मनातून हिरमुसली. आता तर प्रियांकापुढे तिला स्वत:ला असुरक्षित वाटू लागले आहे. ‘ माझे व निकचे संबंध आता संपल्यात जमा आहेत. मी त्याच्यासोबत पॅचअप करण्याचे बरेच प्रयत्न केलेत. त्याला भेटायलाही गेले. यावेळी त्याचे प्रियांकावर प्रेम असल्याचे त्याने सांगितले. मला प्रचंड वाईट वाटले. मी प्रियांकाला कुठल्याहीप्रकारे टक्कर देऊ शकत नाही. कारण तिच्याकडे प्रिन्स हॅरीची वाईफ मेगन मर्कलसारखे मित्र आहेत. तिचे स्टारडम मोठे आहे,’असे डेल्टा ताज्या मुलाखतीत म्हणाली.
प्रियांकासोबत रिलेशनशिपमध्ये असण्यापूर्वी निक डेल्टाला डेट करत होता. निकसोबत रिलेशनशिपमध्ये असताना डेल्टा त्याच्याबद्दल बोलताना थकत नव्हती. मी नशिबवान आहे की, माझ्या आयुष्यात निकसारखी व्यक्ती आहे. मी सध्या प्रचंड आनंदी आहे, असे ती सतत सांगायची. पण अचानक निकसोबत तिचे काहीतरी बिनसले आणि दोघांचेही ब्रेकअप झाले. डेल्टा ही आॅस्ट्रेलियाची सिंगर, कंपोझर, राईटर व अ‍ॅक्ट्रेस आहे.
सुमारे वर्षभर रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले होते. अर्थात आम्ही पुन्हा एकत्र येऊ, अशी आशा डेल्टाने त्यावेळी व्यक्त केली होती. पण आता ही आशा कदाचित धूसर दिसतेय. कारण निक प्रियांकाच्या प्रेमात जणू आकंठ बुडाला आहे. अद्याप प्रियांकासोबतचे नाते त्याने मान्य केलेले नाही. पण प्रियांका व तो ज्याप्रमाणे सार्वजनिक आयुष्यात वावरत आहेत, ते पाहता दोघांमध्येही मैत्रीपेक्षा बरेच काही असल्याचे स्पष्ट दिसतेय.

ALSO READ : फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!
Web Title: Nick Jonas's X Girlfriend says, Priyanka Chopra is not possible !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.