हॉलिवूडची अतिशय हॉट आणि सेक्सी मॉडेल ओलिविया कल्पो तिच्या हॉटनेसमुळेच अधिक चर्चेत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे अमेरिकन सिंगर निक जोनास याची एक्स-गर्लफ्रेन्ड. निक जोनास सध्या प्रियांका चोप्राला डेट करतोय. 

सध्या निक आणि प्रियांकाच्या अफेअरची कधी नव्हे इतकी चर्चा रंगली आहे. इतकेच काय तर दोघांच्या लग्नाचीही चर्चा होत आहे. अर्थात प्रियांका व निकने अधिकृतपणे या नात्याची घोषणा केलेली नाहीये. पण निक प्रियांकाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे मानले जात आहे. याचं निकचे याआधी तब्बल सात मुलींसोबत अफेअर होते. ओलिविया याच सातपैकी एक.

ओलिविया व निक २०१३ मध्ये एकमेकांना डेट करत होते. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले.
ही ओलिविया प्रियांकापेक्षाही हॉट आहे, हे सांगायला नकोच. सध्या ओलिविया स्वत:चे एकापेक्षा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय. तिचे ताजे फोटो बिकनीतील आहे.

२०१२ मध्ये ओलिविया मिस युनिव्हर्स स्पर्धेत सामील झाली होती. पण मिस युनिव्हर्सच्या मुकूटाने तिला हुलकावणी दिली होती.
यानंतर ओलिविया अनेक हॉलिवूडपटात दिसली़ द अदर वूमन या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी आजही ती ओळखली जाते.


Web Title: nick jonas ex-girlfriend olivia culpo sexy photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.