naomi watts will lead role in game of thrones prequel | ‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार! नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका!!
‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार! नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका!!

टीव्ही चॅनल एचबीओची गाजलेली सीरिज ‘गेम आॅफ थ्रोन्स’ कायम चर्चेत राहिली आहे. आत्तापर्यंत या सीरिजचे ७ सीझन प्रसारित झाले आहेत. ‘गेम आॅफ थ्रोन्स’चे हे सातही सीझन प्रचंड लोकप्रीय झालेत. आता या सीरिजचा प्रीक्वल चर्चेत आहे. होय, लवकरच या सीरिजचा प्रीक्वल येणार, असे कळतेय. केवळ इतकेच नाही तर या प्रीक्वलमध्ये कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार, याचाही खुलासा झालाय. चर्चा खरी मानाल तर ‘गेम आॅफ थ्रोन्स’च्या प्रीक्वलमध्ये हॉलिवूड अभिनेद्धी नाओमी वाट्स ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘गेम आॅफ थ्रोन्स’च्या प्रीक्वलमध्ये हजारो वर्षांपूर्वीची कथा पाहायला मिळणार. या प्रीक्वलचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण नाओमीशिवाय अनेक बड्या दिग्गजांची यात वर्णी लागणार आहे.
‘गेम आॅफ थ्रोन्स’ने ड्रामा सीरिजमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचमुळे प्राईम टाईम एमी पुरस्कार 2018मध्ये या सीरिजला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजच्या अवार्डने गौरविण्यात आले. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ने एमी अवार्ड 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट मेकअप, सर्वोत्कृष्ट पोशाख, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन असे एकूण सहा पुरस्कार आपल्या नावे केलेत.

English summary :
TV channel HBO's upcoming series 'Game of Thrones' has always been in the news. So far seven seasons of this series have been broadcast. Now the series' prequel is in the discussion. Hollywood actress Naomi Watts will appear in the lead role of 'Game of Thrones'.


Web Title: naomi watts will lead role in game of thrones prequel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.