Mental perversions spreading rumors of rumblings; Brother's fury !! | रॅम्बोच्या निधनाची अफवा पसरविणारे मानसिक विकृत; भावाचा झाला संताप!!

लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉनने सोशल मीडियावर पसरविल्या जाणाºया मृत्यूच्या बातम्यांची कठोर शब्दात निंदा केली आहे, तर त्यांच्या भावाने अशा बातम्या पसरविणारे मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले आहे. ७१ वर्षीय सिल्वेस्टर यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘कृपा करून अशाप्रकारच्या मुर्ख स्वरूपाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. मी जिवंत असून, सदृढ आणि आनंदी आहे. सिल्वेस्टर यांनी ‘रॅम्बो’ आणि ‘रॉकी’ या चित्रपटांच्या सिरीजमध्ये काम केले आहे. सिल्वेस्टर स्टेलॉन अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय असून, बºयाचशा चित्रपटांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अ‍ॅक्शनचा जुना अंदाज अजूनही कायम असून, प्रेक्षकांना मोहिनी घालणारा ठरत आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर आपल्या भावाच्या मृत्यूच्या अफवा पसरविल्या जात असल्याने सिल्वेस्टर यांचे भाऊ फ्रॅँक (६७) चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यांनी अफवा पसरविणाºयांना खडेबोल सुनावताना म्हटले की, ‘कू्रर आणि आजारी मानसिकता असलेले लोकच अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करीत आहेत. अशाप्रकारचे लोक मानसिकरीत्या विकृत आहेत. अशा लोकांना समाजात कुठलेच स्थान नाही.’ दरम्यान, सोशल मीडियावर काही असे फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये सिल्वेस्टर रॅम्बो यांची प्रकृती खूपच बिकट दाखविली होती. शिवाय त्यांचे निधन झाल्याच्याही अफवा पसरविण्यात आल्या होत्या. 
 

याविषयी सिल्वेस्टर यांनी म्हटले की, ज्या फोटोमध्ये मी आजारी असल्याचे अन् माझ्या डोक्यावर केस झळल्याचे दाखविण्यात येत आहे, तो फोटो माझ्या कुठल्याही तरी चित्रपटातील आहे. एका दृश्यादरम्यान मला अशा स्थितीत दाखविण्यात आले होते. आता त्याचाच आधार घेऊन माझ्या मृत्यूच्या अफवा पसरविल्या जात आहेत. सोशल मीडियावर गेल्या सोमवारपासून सिल्वेस्टर यांचे कर्करोगाने निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र त्या पूर्णत: अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 
Web Title: Mental perversions spreading rumors of rumblings; Brother's fury !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.