ठळक मुद्देपुढील वर्षी मेगन आई होणार आहे. त्यापूर्वी मेगन आणि हॅरी दोघेही विंडसरस्थित नव्या रॉयल कॉटेजमध्ये राहायला जाणार असल्याचे कळतेय.

ब्रिटनचा ड्यूक अ‍ॅण्ड डचेस ऑफ  ससेक्स प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल सध्या आपल्या प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच मेगन ब्रिटीश फॅशन अवार्ड इव्हेंटमध्ये गेस्ट म्हणून दिसली. पण या इव्हेंटमध्ये मेगनने ब्रिटनच्या शाही कुटुंबाचा एक प्रोटोकॉल पायदळी तुडवला. होय, या इव्हेंटमध्ये मेगन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या ब्लॅक कलरच्या ड्रेससोबत मेगनने मॅचिंग ब्लॅक नेलपेंट लावली होती.

ब्रिटनच्या शाही घराण्यातील महिला डार्क कलरचे नेलपेंट लावत नाहीत. शाही घराण्याचा हा अलिखित नियम आहे. त्यामुळेच क्वीन एलिझाबेथ आणि केट मिडल्टन नेहमी लाईट वा पिंक कलरच्या नेल शेड लावतानाचं दिसल्या आहेत. पण मेगनने हा शाही घराण्याच्या या नियमाकडे दुर्लक्ष करत, या इव्हेंटसाठी डार्क शेडचे नेलपेंट निवडले.

यापूर्वीही मेगन शाही घराण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसली आहे. होय, लग्नानंतर क्वीन एलिझाबेथच्या आॅफिशिअल बर्थडे सेलिब्रेशनमध्ये मेगनने शाही नियमांकडे दुर्लक्ष केले होते. यावेळी मेगन आॅफ शोल्डर ड्रेस कॅरी केला होता.

नियमानुसार, शाही समारोहात अशा प्रकारच्या ड्रेसला मनाई असते. आता मेगन पुन्हा एकदा शाही घराण्याचा प्रोटोकॉल मोडताना दिसली.
पुढील वर्षी मेगन आई होणार आहे. त्यापूर्वी मेगन आणि हॅरी दोघेही विंडसरस्थित नव्या रॉयल कॉटेजमध्ये राहायला जाणार असल्याचे कळतेय.
या कॉटेजमध्ये १० शयनकक्ष आहेत. हे कॉटेज महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या मालकीची संपत्ती आहे. तूर्तास मेगन व हॅरी लंडनमध्ये केन्सिंटन पॅलेसच्या नॉटिंघम कॉटेजमध्ये राहतात.
४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्कल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचा असून मेगन ३६ वर्षांची आहे. प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.

English summary :
UK's Duke and Duchess of Sussex Prince Harry's wife Megan Markle appeared as a guest in the British Fashion Award Event. But in this event, Megan broke a protocol of Britain's royal family. Yes, Megan appeared in a black dress in this event. Megan had a Matching Black Nailpaint with this black color dress.


Web Title: Meghan Markle breaks royal protocol in the name of beauty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.